Jalgaon Crime | निमखेडीत तरुणाची हत्या; राम मंदिराजवळ आढळला रक्तबंबाळ मृतदेह, जुना वाद संशयाच्या भोवऱ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Crime | साक्षीदार न्यूज | जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात रविवारी रात्री एक भीषण घटना उघडकीस आली असून, एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मृत तरुणाचे नाव सागर साहेबराव सोनवणे (वय २७) असे असुन रविवारी, १४ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १०:१५ वाजण्याच्या सुमारास सागरवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत निमखेडी गावातील राम मंदिर परिसरात टाकून दिल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर सागरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

- Advertisement -

सागर सोनवणे यांच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार असून, या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, प्राथमिक तपासात जुन्या वादातूनच ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Jalgaon Crime

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS