viral video | लाठीमार प्रकरणानंतर जळगाव पोलिस पुन्हा चर्चेत; डान्स बारमधील व्हिडिओ व्हायरल, अनेक प्रश्न अनुत्तरित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

viral video जळगाव | सुनिल भोळे | मतदानाच्या दिवशी झालेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे आधीच चर्चेत असलेले जळगाव पोलिस पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. लाठीमार प्रकरणावरून निर्माण झालेले वातावरण अद्याप शांत होत नाही, तोच सोशल मीडियावर एका डान्स बारमधील व्हिडिओ व्हायरल होत असल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

- Advertisement -

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन ते तीन पोलीस कर्मचारी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, संबंधित हे पोलीस कर्मचारी नेमक्या कोणत्या कारणासाठी डान्स बारमध्ये उपस्थित होते त्यांना काही काम होते का ? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, तो सध्याच्या घटनेशी संबंधित आहे की जुना आहे, याबाबतही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओवरून विविध तर्कवितर्क मांडले जात असून, पोलीस प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मतदानाच्या दिवशीच्या कारवाईनंतर आधीच संवेदनशील झालेल्या वातावरणात हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जळगावमधील पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हा कर्मचारी कोण ? ह्या व्हिडिओची सत्यता पडताळून सविस्तर बातमी लवकरच

तहसील कार्यालयातूनच जप्त वाळूचा डंपर पळवला! भडगावात वाळू माफियांची थेट शासकीय यंत्रणेला चुनौती
‘अजितदादा परतणार?’ संजय राऊतांचा सकाळीच राजकीय बॉम्ब; महाविकास आघाडीत मोठी उलथापालथ होणार का?

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 

जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

viral video

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS