Maharashtra Ratna Award 2025 | जळगाव जिल्ह्यातील चार राजपूत समाजबांधवांना मानाचे पुरस्कार; समाजात आनंद आणि अभिमानाचे वातावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Maharashtra Ratna Award 2025 जळगाव | साक्षीदार न्यूज | राजपूत समाजातील जळगाव जिल्ह्यातील चार मान्यवर व्यक्तींना विविध सामाजिक आणि प्रेरणादायी पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हाभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानित करण्यात आल्याने समाजातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

Maharashtra Ratna Award 2025

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना चे प्रदेश सचिव कॅप्टन राजेंद्रसिंह राजपूत यांना अरबी महिला बहुउद्देशीय संस्था, सावदा यांच्या वतीने ‘मिर्झा गालिब–२०००’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

- Advertisement -

तसेच करणी सेनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सारिकाताई राजपूत यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने ‘आदर्श नारीशक्ती महिला पुरस्कार–२०२५’ प्रदान करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरण आणि समाजप्रबोधनासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

Maharashtra Ratna Award 2025

याच संस्थेतर्फे करणी सेनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रथमेश सूर्यवंशी (धरणगाव) यांना ‘महाराष्ट्ररत्न–२०२५’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि युवकांसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

तसेच चाळीसगाव येथील समाजसेवक श्री प्रवीण सिंग राजपूत यांनाही अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने ‘महाराष्ट्ररत्न–२०२५’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक सेवेमुळे समाजात त्यांचे विशेष योगदान मानले जाते.

Maharashtra Ratna Award 2025

या चारही पुरस्कारांमुळे समस्त राजपूत समाजात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून, जळगाव जिल्हा करणी सेना टीमच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Maharashtra Ratna Award 2025

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS