Jalgaon Ration Ghotala : सरकाने कोरोना महामारीच्या काळात गरीब जनेतेसह सर्वांनाच धान्य मोफत देण्याचे आदेश दिले होते . तेव्हा पासून ते आज तागायत धान्य अनेकांना मोफत दिले जात आहे . या काळात अनेक ठिकाणी धान्य दिले जात नाही , धान्य कमी प्रमाणात दिले जाते , या यासह अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या मात्र त्याकडे पुरवठा विभाग मनावर घेत नाही. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी रेशनचे धान्य साठ्याचे गोडाऊनच सापडले होते .जर धान्य ऑन लाईन वाटले जाते तर मग धान्याचा घोटाळा हा होतोच कसा ? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितले कि जानेवारी पासून २०२४ पासून पाच वर्ष धान्य मोफत दिले जाणार आहे .
जळगांवात झाला रेशन घोटाळा ?
पुरवठा विभागाकडून धान्य तपासणी करीत अनेक यंत्रणा काम करते , धान्याच्या गोडाऊन पाससून ते ग्राहकांपर्यंत तपासणी करण्यात येते तरी देखील जळगावात धान्य घोटाळा झालाच कसा हि आश्चर्याची बाब आहे .यात पुरवठा विभागाकडून जाणीवपूर्वक तर झाले नाही ना का यात पुरवठा विभागच सहभागी आहे का ? कुणाचा फायदा घेऊन हा सर्व घोटाळा झाला आहे यात कोणता मोठा अधिकारी सहभागी आहे का ? या बाबत अनेक अधिकाऱयांशी जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु अनेकांनी यात आमचा हात नाही असे सांगून बोलणे टाळले . हे झाले आहे परंतु यात आमचा सहभाग नाही असेहि त्यांनी सांगितले आहे .पण कसा झाला त्यावर त्यांनी मात्र माहिती देणे टाळले .