RTO Auto Ricksha | ८ एप्रिलला जळगाव आरटीओवर ऑटोचालकांचा मोर्चा; ‘फी सक्ती’विरोधात संताप उफाळला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RTO Auto Ricksha जळगाव | साक्षीदार न्यूज | राज्यातील ऑटो रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ८ एप्रिल रोजी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) मोर्चा काढण्यात येणार आहे. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रदेश अध्यक्ष शशांक राव आणि प्रदेश सरचिटणीस विलास भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून, जळगाव येथे कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी यांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार आहे.

या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीसाठी आकारण्यात येणारी फी. रिक्षा चालकांकडून ५०० रुपये प्रवेश फी आणि ३०० रुपये वार्षिक फी भरण्याची सक्ती होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

संयुक्त कृती समितीच्या मते, ऑटो रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची मागणी मागील दोन दशकांपासून करण्यात येत होती. मात्र मंडळ स्थापन करताना चालक संघटनांशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

तसेच, मंडळात नोंदणी न केल्यास परमिट नूतनीकरण, पासिंग यांसारखी कामे अडवली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, ही सक्ती बेकायदेशीर असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

या संदर्भात २३ मार्च रोजी परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने राज्यभर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

८ एप्रिल रोजी होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी 8421711919 यांनी केले आहे.

RTO Auto Ricksha

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kharat of Jalgaon | नाशिकच्या खरातनंतर आता ‘जळगावचा खरात’...

Kharat of Jalgaon साक्षीदार न्यूज । सुनिल भोळे । देशात सध्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या भोंदू बाबामुळे...

Jal Jeevan Mission | दहिगाव जलजीवन योजनेवर संशयाची सावली;...

Jal Jeevan Mission  यावल | मिलिंद जंजाळे  | यावल तालुक्यातील दहिगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे येत...

Government Corruption | विकासकामांच्या नावाखाली ‘20% कमिशन’चा आरोप; ठेकेदाराचा...

Government Corruption | यावल | मिलिंद जंजाळे | “जनतेची सेवा” करण्याची शपथ घेतलेल्या काही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर विकासकामांच्या बदल्यात ठेकेदारांकडून सुमारे २० टक्के कमिशन...

RECENT NEWS