Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी करण्याकरिता किती हप्ता द्यावं लागतो याची बातमी प्रसारित केली होती . आणि याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी त्यांचे निलंबन केले . इतके होऊन देखील वाळू चोरी थांबायला तयार नाही आज सायंकाळी जळके विटनेर जवळील धोबी वराड या ठिकाणी वाळू खाली करून जात असतांना बस स्टँड ते मराठी शाळा दरम्यान बशीरशहा मगबुलशा फकीर यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे . हे वाळूचे खाली डंपर एमआयडीसी पोलिसांनी पोलीस स्टेशनला जमा केले आहे आणि वृद्धाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
या भागातून दररोज जवळपास शंभराच्या आसपास डंपरच्या साहाय्याने वाळू चोरी सुरु असते .जळके, विटनेर, नेरी जामनेर या मार्गाने जर का तुम्हाला वाळू चोरी करायचीय असेल तर तुम्हाला कलेक्शन रुपी समाधान झाल्या शिवाय तुम्ही वाळू वाहतूक करू शकत नाही अशी परिस्थती आहे . वाळूचे डंपर भरधाव वेगाने तर रस्त्यावरून जातात परंतु खाली झाल्यावर लवकर पोहचण्यासाठी देखील भरधाव वेगाने धावत असतात .म्हसावद ,विटनेर ,जामनेर याकडे दररोज शेकडो डंपर रात्रभर सुसाट वेगाने धावत असतात . मात्र हे डंपर पोलिसांना आणि तलाठ्यांना दिसत नाही का? हप्ते घेतल्याशिवाय हे चालूच शकत नाही अशी देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे .
आज अपघातात एकाचा जीव गेल्यावर महसूल प्रशासन जागे झाले, आणि दररोजची वाळू चोरी थांबविण्यासाठी महसुल विभाग तलाठी यांची गस्त असते परंतु अनेक तलाठी हे फक्त त्यांचा कोठा कसा पूर्ण होईल याकडे त्यांचे लक्ष असते . महसूल विभागाची आणि वाळू माफिया या दोघांमध्ये वाळू चोरी असेल किंवा वाळूचा झालेला ठेका असे या दोघांमध्ये कसे साठे लोटे आहे हे आम्ही तुम्हला पुढील भागात दाखविणार आहे .
आज झालेल्या ह्या अपघातातील ७५ वर्षाचे बशीरशहा मगबुलशा फकीर गावामध्ये परिवारासह राहत होते.संध्याकाळी एका कामानिमित्त मराठी शाळेकडे गेले होते. त्याच वेळेला (एमएच ४७ ए एस ९५४८) हा डंपरने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला . एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना घटना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.या घटनेचा रात्री उशिरा पर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.








