Sant Ravidas Jayanti | जळगावात संत रविदास जयंती भव्यतेने साजरी होणार; चर्मकार विकास संघाची सहविचार सभा उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sant Ravidas Jayanti  जळगाव | साक्षीदार न्यूज | जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघ यांच्या वतीने जगतगुरु संत रविदास महाराज यांची जयंती रविवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संघाची सहविचार सभा सोमवार, २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाध्यक्ष ॲड. अर्जुन भारुळे यांच्या कार्यालयात समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडली.

- Advertisement -

या बैठकीत चर्मकार समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, समाजभूषण व सुप्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच विविध सामाजिक संघटनांच्या सहभागातून संयुक्त पद्धतीने संत रविदास जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जयंतीनिमित्त बाईक रॅली, संत रविदासांच्या प्रतिमेचे पूजन, प्रेरणादायी व्याख्यान आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा मान्यवर आमदार व खासदारांच्या उपस्थितीत सत्कार करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले. कार्यक्रम समाजप्रबोधन व एकतेचा संदेश देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

- Advertisement -

या सहविचार सभेला संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय वानखेडे, प्रदेश सहसचिव ॲड. चेतन तायडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन भारुळे, सचिव प्रा. धनराज भारुळे, उपाध्यक्ष गजानन दांडगे, महानगर अध्यक्ष कमलाकर ठोसर, तरसोद ग्रामपंचायत सरपंच संतोष सावकारे, ज्ञानदेव भारुळे, लिलाधर भारुळे, उमाकांत भारुळे, कैलास वाघ, शिवदास कळसकर, ॲड. मुकेश कुरिल, संदीप ठोसर, तसेच सुनीता डांगे, सौ. उषा दांडगे, सौ. सुशीला तायडे, सौ. रेखा सोनवणे, कमलेश वाडिया आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते

संकट मोचक गिरीश महाजन संकटात सापडणार का ?

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा

Sant Ravidas Jayanti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS