Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा मार्गावर तहसीलदारांची ‘नाईट पेट्रोलिंग’; डंपर जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. शिरसोली ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या आदेशानुसार, तहसीलदारांच्या पथकाने सोमवारी रात्री धडक कारवाई करत वाळूने भरलेला डंपर जप्त केला. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -
रात्रीचा थरार आणि ग्रामस्थांचा संताप

शिरसोली-कुऱ्हाडदा रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाळू माफिकांचे डंपर बेफाम वेगाने धावत असतात. यामुळे ग्रामस्थांची शांतता भंग होत असून, अपघाताची भीतीही निर्माण झाली आहे. नद्यांमधून होणाऱ्या अवैध उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. ग्रामस्थांनी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ तहसीलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या.

झुलेलाल वॉटर पार्कजवळ ‘फिल्डिंग’ अन् डंपर जाळ्यात!

सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने शिरसोली व वावडदा दरम्यान ‘झुलेलाल वॉटर पार्क’ जवळ सापळा रचला. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरला अडवण्यात आले. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट होताच प्रशासनाने डंपरवर जप्तीची कारवाई केली. या मोहिमेत नायब तहसीलदार राहुल वाघ, शिरसोली मंडळ अधिकारी सारीखा मॅडम, अजिंक्य आधळे, तलाठी मयुर महाले, सुरेश चौधरी व इतर कर्मचारी सहभागी होते.

- Advertisement -
प्रशासनाचा ‘वॉच’ कायम; माफियांचे धाबे दणाणले

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता शिरसोली परिसरात तहसीलदारांचे वाहन तैनात करण्यात आले आहे. “कारवाईत सातत्य राहावे, तरच या माफियांना चाप बसेल,” अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वाळू चोरीचं ‘रेट कार्ड’ पोलिसांनीच केले व्हायरल आलं समोर! कुणाला किती ‘पेढे’ आणि कुणाचं ‘रिचार्ज’?

“वाळू माफियांसमोर प्रशासन शरण? जळगावात पुन्हा जीव गेला, नागरिकांचा थेट सवाल!”

 

Sand Mafia Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

Jal Jeevan Mission | “कोट्यवधी खर्च तरी पाणी शून्य!...

Jal Jeevan Mission | यावल | मिलिंद जंजाळे | यावल तालुक्यातील दहिगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेला पाणीपुरवठा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून...

RECENT NEWS