Indian History | शिवकालीन शस्त्रांचा थरारक इतिहास प्रत्यक्ष अनुभवला! जळगावात विद्यार्थ्यांची ऐतिहासिक प्रदर्शनाला मोठी गर्दी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Indian History जळगाव | साक्षीदार न्यूज | येथील हिंदु जनजागृती समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विराट हिंदु जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर शिवकालीन शस्त्र-सामग्रीचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. सभेच्या दुसऱ्या दिवशी या प्रदर्शनाला शहर व परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

- Advertisement -

मानवसेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, मानवसेवा प्राथमिक विद्यामंदिर, बाल मोहन मराठी शाळा व माध्यमिक विद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय, रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कूल, के. सी. इंग्लिश मिडीयम स्कूल, बालविश्व प्राथमिक केंद्र आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या प्रदर्शनात तलवार, चिलखत, भाले, बाण, गदा, अडकित्ता, त्रिशूल तसेच तोफा यांसारख्या युद्धसज्ज शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना सविस्तरपणे देण्यात आली. शस्त्रांचा वापर कसा केला जात असे, स्वसंरक्षणासाठी कोणत्या प्रकारची साधने उपयुक्त ठरतात, तसेच शिवकालीन युद्धतंत्राची वैशिष्ट्ये याविषयी मार्गदर्शकांनी सोप्या भाषेत माहिती दिली.

- Advertisement -

कट्यार व इतर दुर्मीळ शस्त्रप्रकार पाहताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष कुतूहल दिसून आले. इतिहासातील या वस्तू प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक जिवंत झाला. आजच्या पिढीला इतिहासाची अशी ओळख होणे ही काळाची गरज असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Indian History

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS