Jalgaon RTO साक्षीदार न्यूज / जळगाव, दि. २८ एप्रिल २०२५ / जळगाव जिल्ह्यात तालुका स्तरावर अनधिकृत विक्रेत्यांकडून नवीन वाहनांची विक्री होत असल्याच्या तक्रारींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात गणेश ढेंगे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११२ अंतर्गत कठोर कारवाईची विनंती केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत शोरूम आणि सब-डीलर्सद्वारे वाहन विक्रीचा गैरप्रकार सुरू आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार, केवळ अधिकृत व्यवसाय प्रमाणपत्र (ट्रेड सर्टिफिकेट) धारकांनाच नवीन वाहन विक्रीची परवानगी आहे. मात्र, अनेक विक्रेते नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे वाहन विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले की, अनधिकृत वाहन विक्री हा कायद्याचा भंग आहे. यासाठी आरटीओकडून तपासणी आणि कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनीही या प्रकरणी कायदेशीर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
नागरिकांनी फक्त अधिकृत डीलर्सकडूनच वाहने खरेदी करावीत आणि अनधिकृत विक्रेत्यांबाबत माहिती असल्यास आरटीओ किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
M S R L M | जळगावात अनिल बडगुजर आत्महत्या प्रकरण: सुसाइड नोटमधून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, नागरिकांचा पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह ?
Jalgaon RTO