back to top
शुक्रवार, फेब्रुवारी 27, 2026

Jalgaon ZP Health Department | जळगाव जि.प. आरोग्य विभागाच्या औषध खरेदी प्रकरण तापले डॉ. भायकरांचे धाबे दणाणले; उचलबांगळी अटळ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon ZP Health Department | सुनिल भोळे | जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था झाली आहे. गरिबांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस औषध खरेदी प्रकरणामुळे आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या खुर्चीला सुरुंग लागला असून, त्यांच्या कथित भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात नुसती खळबळच उडाली नाही, तर आरोग्य विभागाच्या विश्वासार्हतेचे धिंडवडे निघाले आहेत.

- Advertisement -

माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी या भ्रष्टाचाराचे बिंग फोडत प्रशासनाला जागे केले आहे. औषध खरेदीच्या नावाखाली चाललेल्या या ‘गोलमाल’ विरोधात त्यांनी वरिष्ठ स्तरावर पुराव्यासह तक्रार केली होती . भोळे यांनी सादर केलेल्या निवेदनांमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आता या प्रकरणाची गंभीर दखल घेणे भाग पडले आहे.

भायकरांच्या उचलबांगळीची केवळ औपचारिकता बाकी?

- Advertisement -

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, डॉ. भायेकर यांची गच्छंती आता निश्चित मानली जात आहे. प्रशासनातील वरिष्ठ पातळीवर त्यांच्या हकालपट्टीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. बोगस औषध खरेदी करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालणे प्रशासनाला आता परवडणारे नाही. त्यामुळे डॉ. भायेकर यांच्या जागी एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या आणि खमक्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जनतेचा संताप: नुसती बदली नको, कठोर कारवाई करा!

केवळ बदली करून या प्रकरणावर पडदा टाकू नका, तर या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींना गजाआड करा, अशी संतप्त मागणी आता जळगावकर नागरिक करत आहेत. आरोग्य विभागातील या भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही.

प्रशासन आता काय ‘ठोस’ पावले उचलते आणि औषध खरेदीतील या भ्रष्टासुरांचा बंदोबस्त कसा करते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती तलवार? कार्यरत शिक्षकांनाही TET बंधनकारक; 2027 अंतिम मुदत
75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात मोठा खुलासा; अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा विभागाचा दावा
 पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर शिस्तभंग कारवाई; खाजगी प्रॅक्टिस प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

“रथ चौकात RTI कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी! दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार”

माहिती न दिल्याची मोठी शिक्षा! अधिकाऱ्यावर २५ हजारांचा दंड; हायकोर्टाची शिक्कामोर्तब

Jalgaon ZP Health Department

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Gaon Gwala Yojana | सरकारी नोकरी आता गाई चारण्यासाठी!‘गाव...

Gaon Gwala Yojana | साक्षीदार न्यूज | सरकारी नोकरी म्हणजे फक्त कार्यालयीन काम असा समज असताना राजस्थान सरकारने एक वेगळीच संकल्पना पुढे आणली आहे....

Maharana Pratapsinh Jalgaon | जळगावमध्ये महाराणा प्रतापसिह राज्याभिषेक दिनानिमित्त...

Maharana Pratapsinh Jalgaon | साक्षीदार न्यूज  | जळगाव येथे २८ फेब्रुवारी रोजी महाराणा प्रतापसिह यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री...

Jalgaon Cultural Event | ‘अनुभूती’च्या स्वरांतून मोठेभाऊंना भावपूर्ण आदरांजली;...

Jalgaon Cultural Event | जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी...

RECENT NEWS