जळगाव;- रावेर येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांच्या नावाची रावेर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत घोषणा केली. श्रीराम पाटील यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला आहे.आता भाजपच्या रक्षा खडसे यांची राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटील यांच्यासोबत दुरंगी लढत होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पुण्यातील बैठकीत माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यावेळी पक्षाने दिलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. नियोजन सुरु करा असे मार्गदर्शन यावेळी शरद पवार यांनी केले.