अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;- अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुक्यातील नांदगाव शिवारातील शेत गट क्रमांक ३३ येथील गिरणा काठाजवळ जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई केली असून चालका हा वाहन सोडून फरार झाल्याची घटना शनिवारी २७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

जळगाव शहरातील नांदगाव शिवारातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्यानुसार . शनिवारी २७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता पोलीसांनी अवैधरित्या वाळूने भरलेले ट्रॅक्टरवर कारवाई केली. यावेळी पोलीसांना पाहून ट्रक्‍टरचालक हा ट्रॅक्टर घेवून पसार झाला. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता पोहेकॉ बापू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे हे करीत आहे.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS