स्मिता वाघ ,रक्षा खडसे यांचे उमेदवार अर्ज दाखल ; महारॅलीत फडणवीसांचा सहभाग
जळगाव ;- पंतप्प्रधान नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी २५ कोटी लोकांनां गरिबीच्या बाहेर काढले . हा रेकॉर्ड असून आजपर्यंत हे जगातील कुठल्याच देशाला जमले नाही ते मोदींनी करून दाखविले. ५५ कोटी जनतेला गॅस मिळवून दिला. ज्यांच्या घरात शौचालये नाही त्यांना शौचालये उपलब्ध करून दिली. ६० कोटी जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून दिले ,२० कोटी लोकांना घरे दिली यासह देशाच्या विकासाकरिता भरीव योजनेद्वारे विविध योजनांचा कोट्यवधी जनतेला लाभ मिळवून दिला . अशापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि देशाचा विकास करण्याकरिता पुन्हा मोदी सरकार निवडून द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागावात आयोजित जाहीर सभेत बोलतांना केले.
रावेर आणि जळगाव लोकसभेच्या उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी आज आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महारॅली काढण्यात येऊन जाहीर सभा आयोजित करण्यात आली . याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील,आ. चिमणराव पाटील,आ. राजूमामा भोळे,आ. मंगेश चव्हाण यांच्यासह पाडाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, भारत येत्या काही काळात तिसरी महा अर्थव्यवस्था होईल . त्यामुळे भारताचा विकास वेगाने होईल. ७००० किमी पर्यंत मारा करणारे बामहोस क्षेपणास्त्र भारताने तयार केले आहे. ते इतर जगाला जमले नाही ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाकरता आज मोदीजींनी प्रयत्न सुरू केले आहे. बचत गटांच्या माध्यमातून कोट्यवधी महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. हि निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदानाच्या निमित्याने रक्षाताई आणि स्मिता ताईच्या नावासमोरची कमळाचे बटन दाबून जळगाव जिल्ह्याची बोगी ही मोदी यांच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवर देश अत्यंत वेगाने त्जाईल असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन,,मंत्री अनिल पाटील,पालकमंत्री गुलाबराव पाटील,आ. मंगेश चव्हाण यांची भाषणे झाली . भाषणांमधुन सर्वानी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला . दरम्यान जाहीर सभा होण्याआधी महायुतीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून दुपारी २ वाजता महा रॅलीला सुरुवात करण्यात आली . जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला .