राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत येत आहे तर अनेक जिल्ह्यात आंदोलकांनी राजकीय नेत्यांना टार्गेट केले आहे यामुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. आधी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये बस फोडण्यात आल्या, जाळण्यात आल्या आहेत. तर बीड, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

यापार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या अनेक भागात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान बीड, धाराशिव, यानंतर आता संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून संचारबंदी करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हादंडाधिकारी जनार्धन विधाते यांनी याबाबतचे आदेश रात्री काढले आहेत. जिल्ह्यात जाती-जातीत तणाव, मराठा-धनगर समाजाचे आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनास छत्रपती संभाजीनगरमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषण, ठिय्या आंदोलने सुरू आहेत. तर मराठा आरक्षणासाठी तुम्ही आवाज उठवा. मुख्यमंत्र्यांना फोन लावा, खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी मराठा आंदोलकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS