rohit pawar firing | थरारक घटना! रोहित पवारवर हॉटेलमध्ये गोळीबार, एक आरोपी ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

rohit pawar firing | साक्षीदार न्यूज | जामखेड-बीड रोडवरील न्यू कावेरी हॉटेल परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सात ते आठ जणांच्या संशयित टोळीने हॉटेलवर अचानक हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली असून, या हल्ल्यात हॉटेल मालक रोहित अनिल पवार जखमी झाले आहेत.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, रोहित पवार हे रात्रीच्या सुमारास आपल्या हॉटेलसमोर उभे असताना एक स्विफ्ट कार तेथे आली. कारमधून पाच ते सात जण खाली उतरले. त्यापैकी तिघांकडे गावठी कट्टे असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांनी थेट गोळीबार सुरू केला.

गोळीबार सुरू होताच रोहित पवार यांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या मागील बाजूने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान त्यांच्या पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत काही अंतर पळाल्यानंतर ते अंधारात लपून बसले.

- Advertisement -

दरम्यान, हल्लेखोरांनी पुन्हा हॉटेल परिसरात येत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता हॉटेल मालकांच्या कारचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमी रोहित पवार यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. गोळीबारामागील नेमके कारण काय, याचा पोलीस तपास सुरू आहे.

Anti Corruption Bureau | रावेर तालुक्यात एसीबीचा सापळा; चोरवाड नाक्यावर स्टेट एक्साईज अधिकाऱ्यावर कारवाई

Bhusawal Firing | भुसावळ हादरले! सट्ट्याच्या टपरीवर रोकड लुटण्याचा प्रयत्नात एकावर गोळीबार

Jalgaon Education Scam | बिग ब्रेकिंग । जळगाव भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षकाचे निलंबन किंवा डिमोशन

rohit pawar firing

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS