Jamner Murder | जामनेरमध्ये २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; शहरात तणाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jamner Murder जामनेर | साक्षीदार न्यूज | एका धक्कादायक घटनेत २१ वर्षीय तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आल्याने जामनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत तरुणाचे नाव सुलेमान रहीम खान (वय २१, रा. छोटा बेटावद, जामनेर) असे आहे.

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, सुलेमान हा आज दुपारी जामनेर शहरात काही कामासाठी आला होता. यावेळी शहरातील एका कॅफेमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर या व्यक्तींनी सुलेमानचा पाठलाग करत त्याच्या गावी, छोटा बेटावद येथे जाऊन पुन्हा त्याला मारहाण केली. या मारहाणीत सुलेमान गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

सुलेमानच्या कुटुंबीयांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जामनेर पोलीस ठाण्यास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

- Advertisement -

या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु काही स्थानिक तरुणांचा यात सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक जामनेर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे

Jamner Murder

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS