back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

६ जानेवारी पत्रकार दिन ; जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोकमत संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन

- Advertisement -

जळगाव । सुनिल भोळे । पत्रकार दिन निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोजी ठीक 10:30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले असून यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.तरी जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघांचे इलेक्ट्रिनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत संपादक संजय आवटे असणार आहेत तर दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन,पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणारं असून प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजुमामा भोळे, आ. किशोरअप्पा पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रांतधिकारी विनय गोसावी,लोकमत जळगाव आवृत्ती संपादक, किरण अग्रवाल,पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी, श्री राष्ट्रीय करणीसेनेचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीणसिहं पाटील,सातपुडा ऑटोचे संचालक किरण बच्छाव,मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघांचे संचालक जेष्ठ पत्रकार कमलाकर वाणी,जेष्ठ पत्रकार विजय पाठक,दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र पाटील,पत्रकार संघांचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे,खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी मान्यवर उपस्थित राहतील.

- Advertisement -

जिल्ह्यातील १० जणांना दर्पणकार पुरस्कार

पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया व छायाचित्रकार अशा एकूण १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार जाहीर आले आहेत. यात –

प्रिंट मीडिया :
•चंद्रशेखर जोशी (तरुणभारत)
•सुनील पाटील (लोकमत),
•सुधाकर जाधव (दिव्यमराठी)
•चेतन साखरे (देशदूत)

इलेक्ट्रॉनिक मीडिया :
•किशोर पाटील (किशोर पाटील)
•संजय महाजन (साम TV )
•विजय वाघमारे (न्यूज 18 लोकमत),

डिजिटल मीडिया :
नरेंद्र पाटील, पुढारी (डिजिटल)
निलेश पाटील (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल)

छायाचित्रकार – सचिन पाटील, लोकमत

तरी जिल्ह्यातील पत्रकार बांधव व पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी,नागरिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष,नागराज पाटील,ग्रामीण जिल्हाध्यक्ष, संतोष नवले,खान्देश विभाग उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, अबरार मिर्झा, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हाध्यक्ष भगवान मराठे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रमोद रुले, महानगराध्यक्ष योगेश चौधरी यांनी केले आहे.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS