जयश्रीताईंचा ‘हम सब एक है’ चा नारा; मास्टर कॉलनी परिसरात झाले जंगी स्वागत…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनील भोळे ) : – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. आज (दि.५) दुपारच्या प्रचार सत्रात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या प्रभाग क्रमांक १८ मधील प्रचाराचा दौऱ्याचा शुभारंभ संतोषी माता मंदिर येथे केला. त्यानंतर पुढे मास्टर कॉलनी भागात जयश्रीताई सुनील महाजन यांनी सर्व धर्मीय एकजूटता आणि जातीय सलोखा दाखवत ‘हम सब एक है’ चा नारा देत परिसरातील नागरिकांची मने जिंकली.

- Advertisement -

'We are all one'

यावेळी आपल्या एकोप्याला तडा न जाऊ देता फक्त शहराचा विकास, तरुणांना रोजगार, महिलांची सुरक्षा आणि सर्वधर्मसमभाव या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हासमोर बटण दाबून यावेळी मतदान करा, अशी आर्त साद जयश्रीताईंनी उपस्थित नागरिकांना घातली. दरम्यान परिसरातील महिलांकडून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांशी संवाद साधत, ज्येष्ठांचे आशिर्वाद घेत त्यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली.

- Advertisement -

यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे किरण राजपूत, अशोक लाडवांजरी, मुकुंद सपकाळे, जयाताई तिवारी, गायत्रीताई सोनवणे, माजी नगरसेविका पार्वताबाई भिल्ल, नीताताई सांगोडे, मनीषाताई पाटील, सुनील भाऊ माळी, किरण भावसार, प्रमोद नाईक, शाम तायडे, झाकीर शेख, डॉ सईद शाह, दानीश खान, एहफास खान, रज्जाक शाह, फिरोज मुलतानी आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS