माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माजी खासदार ह्या त्यांचे म्हणे सादर करण्यासाठी न्यायालयात हजर होत नाही म्हणून त्यांना आता न्यायालयाने रामपूरच्या एसपींना जयाप्रदा यांना अटक करून हजर करण्यास आदेश दिलेलं आहेत .
आचारसंहिता भंगाच्या दोन प्रकरणात माजी खासदार जयाप्रदा यांना खासदार-आमदार न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांच्या वकिलाचा युक्तिवाद फेटाळत न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट हे कायम ठेवण्याचे आदेश दिले . या बरोबरच त्यांना अटक करून कोर्टात हजर करा, असे पत्र एसपींना लिहिले आहे.
न्यायालयाने जयाप्रदा यांना जे जामीनदार झाले होते त्यांना देखील नोटीसही बजावन्याय आली आहे . या प्रकरणाची सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि 2019 मध्ये माजी खासदार जयाप्रदा यांच्या विरोधात स्वार आणि केमारी पोलिस ठाण्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते .हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
स्वार येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादी पक्षाची साक्ष पूर्ण झाली असून, माजी खासदार यांचे म्हणणे अद्याप नोंदवायचे आहे. यानंतरही ती आपले म्हणणे नोंदवण्यासाठी न्यायालयात पोहोचत नाही. केमारी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यात फिर्यादीची साक्ष सुरू आहे, मात्र या प्रकरणात माजी खासदार न्यायालयात हजर झाले नाहीत.
लागोपाठच्या दोन्ही प्रकरणात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाचे वकील असगर यांनी माजी खासदाराच्या वतीने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला. याला सरकारी वकिलांनी विरोध केला.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने माजी खासदाराचा अर्ज फेटाळून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. तसेच आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. त्याच्या जामीनदारांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे.