back to top
रविवार, एप्रिल 20, 2025

जयश्रीताई तुम्हीच शहराच्या विकासाची नवी आशा; प्रभाग क्र ६ मधील लाडक्या बहिणींचा एकच सूर…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव (सुनील भोळे ) ; – महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रचाराला उत्साहपूर्ण सुरुवात केली. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन जयश्रीताई आपल्या विजयाची प्रार्थना करत प्रचार रॅलीला सुरुवात केली. महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी रॅलीत सहभागी होत जयश्रीताईंना समर्थन दिले, ज्यामुळे प्रचारात आणखी उर्जा निर्माण झाली.

- Advertisement -

Ward No. 6

जयश्री महाजन यांच्या प्रचारादरम्यान महिलांनी आणि लहान मुलींनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तर काही ज्येष्ठ आजीबाईंनी प्रेमाने त्यांना मिठी मारून आशीर्वाद दिले. महिलांच्या या प्रेमळ स्वागतामुळे जयश्री महाजन भावूक झाल्या आणि त्यांनी सांगितले की, “महापौर म्हणून काम करत असताना मला प्रशासकीय कामकाजाचा जवळून अनुभव घेता आला आहे. त्यामुळे जळगाव शहराच्या विकासातील अडथळे आणि आवश्यक बाबी मी चांगल्याप्रकारे ओळखते. या अनुभवाच्या आधारे मी प्रभागाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे.”

- Advertisement -

महिलांनी जळगाव शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करत, “शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि जयश्रीताई याच योग्य उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्वात शहराला प्रगतीची दिशा मिळेल, असा आशावादही व्यक्त केला.

Ward No. 6

महाविकास आघाडीला ठाम पाठिंबा आणि मशाल चिन्हासाठी आवाहन
महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी जयश्री महाजन यांच्यासाठी पूर्ण समर्थन व्यक्त केले आहे. यावेळी या नेत्यांनी मतदारांना आवाहन केले की, ‘जयश्रीताईंनी आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात शहरासाठी प्रभावी प्रकल्प साकारले आहेत आणि हाच त्यांचा अनुभव शहराच्या विकासाला अधिक गतिमान करेल.’ त्यानंतर जयश्री महाजन यांनी मतदारांना मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करत सांगितले की, “आपल्या समर्थनाने मला निवडून दिल्यास जळगाव शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मी कटीबध्द आहे.

तरुण मतदारांचा जोश आणि सहभाग
जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीत महिलांसोबत तरुण मतदारांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काही तरुणांनी जयश्री महाजन यांच्याकडे शहराच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी त्यांच्या योजनांविषयी विचारले. जयश्री महाजन यांनी आश्वासन दिले की, ‘शहरातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.’

शहरातील समस्यांवर संवेदनशीलता
जयश्री महाजन यांनी प्रचार रॅलीदरम्यान परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अतिक्रमण, स्वच्छता, आणि पाणीपुरवठा या समस्यांवर महिलांनी त्यांचे लक्ष वेधले. यावर जयश्री महाजन यांनी या सर्व समस्या सोडवण्यासाठी भविष्यातील योजनांमध्ये प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक ६ मध्ये आशेचा एक नवा किरण दिसत असून, जयश्री महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव शहराला सर्वांगिण विकासाची व प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा आशावाद व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS