back to top
शनिवार, एप्रिल 19, 2025

जयश्रीताई महाजन यांची स्वच्छ प्रतिमा शहराला विकासाची नवसंजीवनी देईल; जळगावकरांचा आशावाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव (सुनील भोळे) ; – विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांमध्ये प्रचाराच्या माध्यमातून चुरस बघायला मिळत आहे. प्रत्येक उमेदवार नागरिकांसमोर आपण केलल्या विकास कामांचा आढावा देत आहे, तसेच भविष्यकालीन योजना आणि आश्वासनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनील महाजन या त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि संयमी राजकारणामुळे तसेच त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वसमावेशक मुद्द्यांमुळे सर्वांपेक्षा वेगळ्या ठरत आहेत.

- Advertisement -

 

Jayashreetai Mahajan

- Advertisement -

जयश्री महाजन यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला गती मिळाली होती. त्यांनी मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच जळगावच्या महापालिकेची कर्जातून केलेली सुटका व त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात झालेली वाढ आजही नागरिकांच्या लक्षात आहे. त्यांच्या या कार्याची जणू उजळणी नागरिकांना त्यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने होत आहे. शहरातील नागरिकांसोबत असलेला त्यांचा जनसंपर्क, त्यामुळे ठिकठिकाणी मिळणारा प्रतिसाद पाहता, शहरातील नागरिक त्यांच्याबद्दल कार्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढत असून, आजवर त्यांनी केलेल्या स्वच्छ राजकारणाला लोकांकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे.

Jayashreetai Mahajan

जयश्री महाजन यांचा प्रचार दौरा शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. सेंट टेरेसा हायस्कूलसमोर, नेहरू नगर परिसर, मोहरी रोड येथील वैद्यकीय हॉस्पिटल परिसर, शारदा कॉलेज परिसर, शिरसोली रोड, नेहरू नगर परिसर, रविंद्र नगर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रबन कॉलनी येथे त्यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी संकल्पित असल्याचे सांगितले.
जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीत महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना साथ देत आहेत. या प्रचार दौऱ्यातील उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता, जयश्री महाजन यांची स्वच्छ प्रतिमा शहराला विकासाची नवसंजीवनी देईल, असा आशावाद जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS