बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनील भोळे) : – शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार दौऱ्याचा धडाका सुरु असून, त्यांचा प्रचार दौरा ज्या भागात असतो त्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादासह प्रचार रॅलीत सहभागही आता जाणवू लागला आहे. जयश्री महाजन यांच्या प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रचारातील नावीन्य. या नावीन्याचीच जळगावकरांना अधिक अपूर्वाई वाटत आहे.

- Advertisement -

जळगावकरांचे प्रश्न होर्डिंगच्या माध्यमातून मांडणे असो की प्रचार फेरी सुरु असतांना, समोर आलेला एखादा लहानगा असो. प्रत्येकाशी जयश्री महाजन या संवाद साधत आहेत. त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून त्यांची जळगावकरांशी असलेली जवळीक व संवाद साधण्याची हातोटी अधोरेखित होत आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून काढण्यात आलेली प्रचार फेरीत समर्थकांनी जयश्री महाजन यांचा प्रचार सुरु होण्याप्रसंगी बग्गी आणून त्यातून संपूर्ण प्रभागात जयश्री महाजन यांची प्रचार फेरी पूर्ण केली. या बग्गीतून प्रचार करण्याच्या नावीन्याचेही जळगावकरांना अपूर्वाई वाटली. या सर्वातून नावीन्यपूर्ण विचार मांडण्याच्या जयश्री महाजन यांच्या कौशल्याचे जळगावकर कौतुक करत असून, त्यांच्या प्रचार दौऱ्याला आता जळगावकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS