साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३ | देशातील अनेक तरुण बेरोजगार असून त्यांना सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आहे पण तशी संधी मिळत नसल्याने अनेक तरुण आज देखील खाजगी क्षेत्रात काम करीत आहे. सध्या इंडो-तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या २४८ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल
पदसंख्या – २४८
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० वा पास किंवा समकक्ष.
अर्ज फी – १००
वयोमर्यादा – २१ ते २३ वर्षे.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – १३ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
पगार –
महिना २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपये. (पे मॅट्रिक्समधील लेव्हल, सातव्या CPC नुसार)