साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | कोरोना सारखे मोठे संकट आल्यानंतर अनेकांनी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेवून नोकरी करण्याचा मानस होता पण गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात देखील नोकरी मिळत नसल्याने अनेकांची स्वप्न भंगले होते पण आता त्यांना एक मोठी संधी मिळाली आहे.
सातारा अंतर्गत परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, ANM पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, सातारा
भरले जाणारे पद – ANM
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय, सातारा
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – 17 ते 35 वर्षे
अर्ज फी –
मागासवर्गीयांसाठी – रु. 200/-
खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्रविषयांसह कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे –
1. शाळा सोडल्याचा दाखला
2. १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
3. १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
4. अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले याबाबतचे प्रमाणपत्र
5. महाराष्ट्र राज्याचे अदिवास प्रमाणपत्र
6. भारतीय नागरिकत्वाचा दाखला
7. जात प्रमाणपत्र
8. जात वैधता
9. नॉन क्रिमीलेअर दाखला
10. आधार कार्ड
11. राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
12. अपंग व्यक्ती फक्त पायाने अपंग (४० ते ५० टक्के) सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक.
13. अनाथ उमेदवारांसाठी महिला व बालकल्याण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक.
14. अपूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
15. प्रत्यक्ष अर्ज घेताना शाळा सोडल्याचा दाखला, १२ वी मार्क लिस्ट व जातीचा दाखला, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा अधिवास दाखला आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. विहीत नमुन्यातील अर्ज परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मिळतील
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.