साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | देशभरातील उच्च शिक्षित तरुणांना नोकरी करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या 7 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यामुळे B.E., B.Tech. पदवी धारकांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
संस्था – रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट
भरले जाणारे पद – ज्युनियर रिसर्च फेलो
पद संख्या – 07 पदे
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
मुलाखतीची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – ज्युनियर रिसर्च फेलो बी.ई./बी.टेक.
मिळणारे वेतन – रु.37,000/- दरमहा
अशी होईल निवड
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
4. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/