साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुणांनी शिक्षण घेतले असून तरी देखील त्यांना आजवर नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहे पण आता जळगाव जिल्ह्यातील विविध खासगी कंपन्या, आस्थापनांवरील १५० रिक्त पदांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याचा तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे.
उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लाय करण्यासाठी ‘सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉगईन करून अप्लाय करावा. संकेतस्थळावर नोंदणी करा ज्यांना नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉग-इन करुन अप्लाय करावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा, असे आवाहन मुकणे यांनी केले आहे.