साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक तरुण-तरुणीनी उच्च शिक्षण घेतले आहे पण अनेकांना आजवर नोकरी नसल्याने बेरोजगार आहे. अशा तरुणासाठी एक मोठी संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून मागवले जात आहेत.
या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पदाचे नाव – क्रेडिट ऑफिसर स्केल – II, क्रेडिट ऑफिसर स्केल – III
एकूण रिक्त पदे – १००
शैक्षणिक पात्रता –
क्रेडिट ऑफिसर स्केल – II : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट
विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + ३ वर्षे अनुभव.
क्रेडिट ऑफिसर स्केल – III : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + ५ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी/ EWS – ११८० रुपये.
मागासवर्गीय – ११८ रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २३ ऑक्टोबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ नोव्हेंबर २०२३