साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | अनेक तरुण तरुणी वैद्यकीय क्षेत्राचे मोठे शिक्षण घेतलेले आहे पण सध्या राज्यात खाजगी क्षेत्रात नोकरी करावी लागत आहे. कारण राज्य सरकारने कुठलीही मेगा भरती नसल्याने अनेक तरुण बेरोजगार देखील आहे. पण आता पुणे शहरात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. पुणे महापालिके अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांसाठी २८८ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे. पुणे महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष).
शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी : MBBS + MCI/ MMC नोंदणी.
स्टाफ नर्स : GNM/ B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) : विज्ञान विषयात १२ वी पास + पॅरामेडिकल ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स.
अर्ज फी – अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.
अर्ज करण्याचा पत्ता –
इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची सुरवात – १८ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२३