साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | देशभरात अनेक उच्च शिक्षित तरुण आहे पण सरकारी नोकरी नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहे. त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी होवू शकते. प्रत्येकाचे स्वप्न असते आपण देखील एखाद्या उद्योगाचे मालक असावे. व्यवसाय सुरू करताना मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक असते. अनेकजण त्यामुळेच व्यवसाय सुरू करण्याचे पाऊल उचलत नाही. परंतु आम्ही तुम्हाला आज अशा व्यवसायांची माहिती देणार आहोत ज्यात तुम्ही कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळवू शकता.
व्यवसाय सुरू करण्यात रिस्क असते. त्यामुळे अनेकजण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत नाही. मात्र, तुम्ही अगदी २० हजार रुपयांमध्ये स्वतः चा व्यवसाय सुरू करुन चांगला नफा मिळवू शकता.
Jobless will get job try thease ideas
मेणबत्त्या बनवणे
मेणबत्त्यांना नेहमीच मागणी असते. २०,००० पेक्षा कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता. सणासुदीच्या काळात मेणबत्त्या किंवा मेणाच्या दिव्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा आहे. मेणबत्त्या या रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये वापरल्या जातात. त्यामुळे तुम्ही कमी खर्चात आणि लहान जागेत हा व्यवसाय सुरू करु शकतात .
लोणचे व्यवसाय
लोणचे हे घराघरात खाल्ले जाते. त्यामुळे लोणच्याला बारामाही मागणी असते. घरच्या घरी आणि स्वस्त किंमतीत बनवणारा हा उत्तम पदार्थ आहे. स्त्रिया घरच्या घरी हा व्यवसाय करु शकतात. कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.
कंटेट रायटिंग
सध्या डिजिटल जगात कंटेट रायटिंग खूप महत्त्वाची आहे. अनेक जण लेखणातून भरपूर पैसे कमवतात. त्यामुळे तुम्ही अनेक वेबसाइटसाठी कंटेट रायटिंग करु शकतात. पुरेशी गुंतवणूक करुन तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकतात
बेबी केअर
आजकाल बहुतेक कुटुंबात दोन्ही पालक काम करत असतात. त्यामुळे घरी बाळावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीच नसते. त्यामुळे त्यांना बाळाची काळजी घेण्यासाठी कोणाची तरी गरज असते. त्यामुळे बेबी केअर हा एक उत्तम व्यवसाय आहे. अनेक जण बेबी केअर केंद्र सुरू करतात. हादेखील एक उत्तम व्यवसाय आहे.
मोबाईल रिपेअरिंग
जर तुमच्याकडे मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस बाबत उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय सुरू करु शकतात. यात मोठ्या भांडवलाचीही आवश्यकता नाही. तुम्ही २०,००० पेक्षा कमी किमतीत हा व्यवसाय सुरु करु शकतात.