स्टेट बँकेत मिळणार नोकरी : आताच करा अर्ज !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक तरुणांना सरकारी नोकरी मिळावी म्हणून सतत अभ्यास करून परीक्षा देत आहेत. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशभरातील सर्वात मोठी बँक समजल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकता.

- Advertisement -

ही पदभरती लिपिक पदासाठी करण्यात आली आहे. यासाठी उमेदवाराने SBI ची अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. तसेच या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. अर्ज प्रक्रिया कशी असेल, अर्ज कसा कराल हे जाणून घेऊया. ज्युनिअर असोसिएट्सच्या पदांवर भरतीसाठी घेतलेल्या लिपिक परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराचे किमान शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर असायला हवे.
या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षाच्या दरम्यान असायला हवे.
या भरतीसाठी उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी ७५० रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे.
या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया विविध टप्प्यात होणाऱ्या परीक्षेवर आधारित असू शकते. या अंतर्गत जानेवारी, २०२४ मध्ये लिखीत स्वरुपातील परीक्षा होऊ शकते. तर मुख्य परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात होईल. अधिक माहितीसाठी अधिकृत साइटला भेट द्या.
अर्ज करण्याची तारीख – १७ नोव्हेंबर, २०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ७ डिसेंबर, २०२३

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS