पिंपरी चिंचवड पुणे । साक्षिदार न्युज । पत्रकारितेच्या माध्यमातून तपास, मनोरंजन, राजकीय विश्लेषण, सामाजिक प्रबोधन, छायाचित्रण इत्यादी प्रकारे पत्रकारिता केली जाते. त्याचप्रमाणे समाजातील दुर्लक्षित घटकांवर झालेला अन्याय ,अत्याचार ,भ्रष्टाचार यांना वाचा फोडून समाजातील प्रभावशाली घटकांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न पत्रकारिता करते. पत्रकरिता हे लोकशाहीचे चौथे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने पत्रकारिता करणे गरजेचे आहे.
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रहितासाठी पत्रकारिता केली. त्यांचा आदर्श पत्रकारांनी घ्यावा. निरपेक्ष पणे व समर्पित भावनेने , सेवाव्रती प्रवृत्तीने पत्रकारिता केल्यास नावलौकिक होते. व समाजाची मान्यता मिळते. अलीकडच्या काळामध्ये शोध पत्रकारितेपेक्षा पित पत्रकारितेचा सुळसुळाट झालेला आहे. अन्यायग्रस्त कमकुवत व्यक्ती ज्या वेळेस पत्रकारांजवळ येते त्यावेळेस पत्रकारांनी त्या व्यक्तीला न्याय दिल्यास पत्रकारितेचे व पत्रकारांच्या कार्याचे सोने होते. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अल्फास् टाइम च्या माध्यमातून अनेक पत्रकार निरपेक्षपणे कार्य करीत आहेत, समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत.म्हणून राष्ट्रहितासाठी व लोककल्याणासाठी निरपेक्षपणे,समर्पित भावनेने पत्रकारिता करावी असे मत फ्री प्रेस लॉन्सर, ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ,अपंग सेवक, हिंदू रत्न पुरस्कार विजेते, ह भ प डॉ.रवींद्रजी भोळे यांनी येथे व्यक्त केले.अल्फास टाईम व न्यूज एटी मीडिया हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन , क्या मेरा या कमर्शियल स्टुडिओचे लोकार्पण आणि अल्फास टाईम मॅगझिनचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्रजी भोळे यांनी वरील मत व्यक्त केले. हा दिवस अल्फास टाईम साठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. यावेळी अल्फास अल्फास टाइम च्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या पत्रकारांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अल्फास टाइम्स चे हितचिंतक वाचक मान्यवर रिपोर्टर पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रमात अत्यंत भव्य भावनिक आणि ऐतिहासिक ठरला सत्यनारायण महापूजेने शुभारंभ झालेल्या या सोहळ्यात अनेक संतश्रेष्ठ आणि मान्यवर उपस्थित होते. ज्यामुळे हा दिवस अधिक पवित्र आणि संस्कारमय झाला उपस्थित संत मान्यवरांमध्ये टाळगाव चिखली संत पिठाची संचालक ह भ प प्रकाश महाराज आहेर, ज्ञानेश्वर महाराज वंशज पुजारी ह भ प प्रफुल्ल महाराज प्रसारे ,अल्फा स टाइम चे प्रमुख गुरव , अल्फास टाईम चीफ ब्युरो ह भ प तुकाराम महाराज नेवाळे ,ह भ प बाळासाहेब गुळवे ,हभप निवृत्ती महाराज लांडे ,प्रतिमा शेंडगे मॅडम ,कपिल शेंडगे ,राजेंद्र प्रसाद परदेशी ,मोहसीन बिन शहाब, मल्हारी शिरोळे, हुसेबा टिंबा वाला,सिने कलाकार अविनाश कीर्ती ,द मार्क सिनेमाचे डायरेक्टर विजय चव्हाण, ऍडव्होकेट फिरदोष शेख ,ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्रजी भोळे, उद्योजिका आफ्रीम पठाण , असलम मोकाशी ,समीर मोकाशी ,संजय कदम, सचिन कुलकर्णी ,सलीम मुल्ला ,आजाद रिक्षा चालक संघटनेचे शफीक पटेल, वनिता परदेशी ,दिलीप सिंग परदेशी, संजय बेरड ,सुरेखा बेरड, अजयसिंह परदेशी ,आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सर्वश्री किरण अंबिके ,फ्री प्रेस लोन सर, ज्येष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रवचनकार ,डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन, सचिन गाडे ,प्रमोद करचे ,उरुळी कांचन येथील जेष्ठ पत्रकार अमोल भोसले ,दीपक आंबवले ,शिवाजी आगवणे, मुकुंद चव्हाण ,सुनील चांदणे, उरुळी कांचन येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुनील तुपे , श्वेता बेरड , सर्पमित्र खलील शेख उरुळी कांचन, अविनाश कीर्ती, प्रफुल्ल पाटील नारखडे सामाजिक कार्यकर्ते यांचा शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला फास्ट टाइम चे मुख्य संपादक राजे खान पटेल यांनी न्यूज एटी चॅनेल तर्फे केलेल्या समाजकार्याचा आढावा घेत लवकरच सॅटॅलाइटवर येण्याचा निर्धार व्यक्त केला . यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुनील तुपे यांनी अल्फास टाईम च्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे निवेदन दत्तात्रय तरडे आणि अक्षदा शिंदे यांनी केले या कार्यक्रमासाठी अक्षय सिंग परदेशी श्वेता बेरड आणि त्रिशा कार्पोरेट सर्विसेस कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले हा कार्यक्रम अल्फास टाईमच्या यशाच्या आणखी एक मौलाचा दगड ठरला. आभार प्रदर्शन होऊन व शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.