यावल ( प्रतिनिधी ) ; – श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक आयोजित पत्रकार दिनानिमित्त कैलास वासी कृष्णाराव पाटील कोठावळे (नाशिकचे मुलकी व पोलीस पाटील )उत्तर महाराष्ट्र पत्रकार सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 24 रोजी सायंकाळी साडेचार वाजता श्री कालिका मंदिर सभागृह जुना आग्रा रोड नाशिक येथे ज्येष्ठ पत्रकार श्री सुरेश भटेवरा यांच्या हस्ते तर श्री अण्णासाहेब पाटील अध्यक्ष श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री रवींद्र नाईक उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचनालय नाशिक विभाग सुभाष तळाजिया खजिनदार डॉक्टर प्रतापराव कोठावळे सरचिटणीस कालिका देवी मंदिर संस्था नाशिक यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .
👉🏾 क्लिक करा ; – तहसीलदार बनले कॉलेज कुमार ; वाळू चे १६ ट्रॅक्टर पकडले
या प्रसंगी उत्तर महाराष्ट्रातील तालुकास्तरावरील प्रत्येकी एक पत्रकाराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे त्यात यावल येथील “दैनिक देशदूत”चे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक समितीचे अध्यक्ष अशोक दुधारे सचिव आनंद खरे यांनी कळविले आहे