Maha Vikas Aghadi धरणगाव (साक्षीदार न्युज ) : – आज धरणगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे प्रचारार्थ मशाल पेटवून गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान गावातील घरोघरी जावून मतदार राजांची भेटघेतली. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत उपस्थित मतदार बंधू भगिनींना मशाल निशाणी समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख व मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी, संघटक राजेंद्र ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील, राष्ट्रवादी तालुका प्रमुख धनराज माळी सर, कॉग्रेस चे तालुका प्रमुख व्ही डी पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत महाजन, युवासेना जिल्हा संघटक विनोद रोकडे, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील परदेशी, शहर प्रमुख परमेश्वर महाजन, शेतकरी संघटना तालुका प्रमुख विजय पाटील यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
👇🏻हे जरूर बघा 👇🏻
ठेकेदाराला मागितली १ पेटी रेकॉर्डिंग झाली व्हायरल
खा. उन्मेष पाटील यांनी केली विकास दूध संघाची पोलखोल
बापा पुढे बापाच्या जागी असलेला सासरा जिंकला…