Karandada Patil पाचोरा (साक्षीदार न्युज ) : – महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. मंगळवार दि.३० रोजी पाचोरा तालुक्यातील माहेजी, कुरंगी, पिंपळगाव हरेश्र्वरसह अनेक गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. रणरणत्या उन्हातही कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’चा नारा देत उत्साह वाढविला.

मंगळवारी पाचोरा तालुक्यातील माहेजी, कुरंगी, नांद्रा, लासगाव, बांबरुड (राणीचे), सामनेर, पहान, मोहाडी, वरखेडी, आंबेगाव, भोकरी, पिंपळगाव हरेश्र्वर येथे प्रचार रॅली काढण्यात आल्या. रॅलीदरम्यान, ठिकठिकाणी फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पिंपळगाव येथे करणदादा पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते नारळ फोडून करण्यात आला.

रॅलीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते संजय वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, प्रा. अस्मिता पाटील, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, विनोद पाटील, बापूसाहेब पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, दादाभाऊ पाटील, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, एकनाथ अहिरे, देविदास पाटील, बापू पाटील, माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपकभाऊ राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, शशी पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, मिथुन वाघ, राजू काळे, पप्पू राजपूत, इमरान पिंजारी, ललित वाघ, मुरान तडवी, प्रदिप वाघ, शरद पाटील, विक्रांत पाटील, बातसरचे माजी उपसरपंच धर्मराज पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, यशवंत पवार, भाऊसाहेब पाटील, अण्णा पाटील, बाळू पाटील, डॉ. हादी देशमुख, अकबर मिस्तरी, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, गटप्रमुख देवीदास पाटील यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Karandada Patil
