विकसित भारतासाठी खडसे येणार असतील तर त्यांचे स्वागत – चंद्रशेखर बावनकुळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

पुणे : विकसित भारताच्या संकल्पनेतून मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सध्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही. एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असतील, तर त्यांचे स्वागतच होणार आहे. खडसे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणताही वाद नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कायम खडसे यांचा सन्मान केला आहे. ते कधीही खडसे यांच्या विरोधात नव्हते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. सध्या जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील, त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग आहे, असेही बावनकुळे यांनी पुण्यात बोलताना सांगितले.

- Advertisement -

बावनकुळे म्हणाले की, एकनाथ खडसे यांना सर्वात जास्त मानाचे स्थान, हृदयातील स्थान देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यापासून दिले आहे, याचा मी साक्षीदार आहे. एकनाथ खडसे हे आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण सहकार्य केले होते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातील एकनाथ खडसे साहेबांचा सन्मान कमी झाला नाही.

विनोद तावडे हे दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राज्यात भविष्यात वेगळे काय पाहायला मिळेल का? असे विचारले असता ते म्हणाले, महायुतीच्या जागेसंदर्भात जवळपास अर्ध्या तासात चर्चा होईल. कारण आमचे सर्वांचे एकमत झाले आहे. एक बैठक होईल आणि जागावाटप अंतिम होईल, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS