आज सुभाष चौकात रात्री ८ वाजता खडसेंची तोफ धडाडणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनिल भोळे) : – शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचारार्थ आज (दि. १५) रोजी रात्री ८ वाजता शहरातील सुभाष चौक येथे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. राजकीय निरीक्षकांची नजर या सभेकडे आहे.

- Advertisement -

यापूर्वी मंत्रीपद सोडल्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांनी सुभाषचौकात जाहीर सभेला संबोधित केले होते. ती सभा गाजली होती. त्यांनतर आज त्यांची पुन्हा याच ठिकाणी सभा होत आहे. आ. खडसे यांचे अभ्यासपूर्ण व दणकेबाज भाषणांसाठी राज्यात नाव घेतले जाते. त्यातच सुभाष चौक येथील सभांना ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून येथे झालेल्या राजकीय सभा गाजल्या आहेत.

ज्यांना त्यांनी घडविले, मोठे केले ते साथ सोडून गेल्यानंतर त्यांच्या विरोधात खडसे आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शहरात विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांच्या विरोधात जयश्री महाजन यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे दिसत असतांना ही सभा होत आहे. विशेष म्हणजे एखाद्या निवडणुकीसाठी जळगाव शहरात सभा घेण्याची आ. खडसे यांची गेल्या दहा वर्षानंतरची ही पहिली वेळ आहे. राजकीय कार्यकर्ते व राजकीय निरीक्षकांमध्ये या सभेबद्दल कुतुहूल आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS