back to top
शनिवार, ऑगस्ट 23, 2025

Khandesh Kanya President | खान्देश कन्या सौ हेमा पवार भाजपा कल्याण शहर महिला अध्यक्षपदी निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Khandesh Kanya President साक्षीदार न्यूज ,|कल्याण ( सुनील इंगळे) | खान्देश कन्या आणि मा. आमदार श्री नरेंद्र पवार साहेब यांच्या पत्नी सौ.हेमा ताई पवार यांची भारतीय जनता पार्टी कल्याण शहर महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कल्याण मधील संपूर्ण खान्देश न्याती समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी खान्देश मराठा पाटील, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ,तेली समाज मंडळ, भोई समाज मंडळ, न्हावी समाज मंडळ, लेवा पाटीदार समाज मंडळ,बहिणाई चॅरिटेबल ट्रस्ट,सोनार समाज मंडळ, वाणी समाज मंडळ व धनगर समाज मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या संपूर्ण सत्कार समारंभाचे नियोजन कल्याणचे आन-बान शान आणि आपल्या सर्व खान्देशी बांधवांना नेहमीच एकत्र आणणारे व एकमेकांना सहकार्य करणारे कृतिशील व्यक्ती श्री.प्रकाश पाटील यांनी केले होते यावेळी उपस्थित समाज प्रतिनिधींनी आपले गौरवास्पद मते सादर केली तसेच कल्याण तेली समाजाचे प्रतिनिधी खान्देशची बुलंद तोफ सुनील भाऊ चौधरी यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की भाजपाला साथ देणाऱ्या आपल्या खान्देशी बांधवांना येत्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भाजपातर्फे उमेदवारी मिळावी, गेली कित्येक वर्षे पक्षाच्या वाढीसाठी खान्देशी बांधव नेहमीच झटत आले आहेत आणि यापुढेही ते कार्यरत राहतील तरी पक्षाने त्यांचा विचार करावा असा आग्रह धरला व सदर प्रेमाची मागणी सौ हेमाताई व मा.आमदार श्री.नरेंद्रजी पवार साहेब यांनी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवावी अशी आग्रहाची विनंती केली. याबाबत हेमाताईंनी त्यास संमती देऊन त्यांच्याकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन उपस्थित सर्व खान्देशी बांधवांचे आभार मानले.

- Advertisement -

 

Khandesh Kanya President

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Today Gold Rate | सोन्याच्या दरात मोठी वाढ; १०...

सणासुदीच्या तोंडावर सोन्याचा भाव वाढला Today Gold Rate | साक्षीदार न्यूज |आज, 23 ऑगस्ट 2025 रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. प्रति तोळा...

Charmkar Vikas Sangh | चर्मकार विकास संघाच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा...

Charmkar Vikas Sangh | साक्षीदार न्यूज | जळगाव येथील चर्मकार विकास संघ आणि गुरु रविदास क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जुलै 2025 रोजी गुणवंत...

Foreign Tours | सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांचे नवीन नियम...

Foreign Tours | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर कडक निर्बंध घातले आहेत. आता या दौऱ्यांचा राज्य सरकारला नेमका काय फायदा...

RECENT NEWS