मदन लाठी यांना खान्देश रत्न – २०२५ पुरस्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज । आरंभ मराठी चॅनल तर्फे दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी खानदेशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 27 व्यक्तिमत्त्वांना खानदेश रत्न 2025 पुरस्कार देऊन गौरवण्यात आले

- Advertisement -

त्यात श्रीमदन रामनाथ लाठी हे मूळचे भोकर निवासी असून त्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा रक्तदानात सिंहाचा वाटा आहे आतापर्यंत त्यांनी 90 वेळेस रक्तदान केलेले आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० मध्ये प्लाझ्मा देऊन चार रुग्णांना जीवदान मिळालेले आहे. त्यांनी आतापर्यंत विविध राष्ट्रीय दिवशी आणि माजी राष्ट्रपती आणि आताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी सरांचा वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर २०२४ रोजी रक्तदान केले आहे.

या बरोबर ते गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी असुन स्वच्छ अभियान, प्लास्टिक बंदी आदींवर दोन वर्षांपासून जनजागृती करीत आहेत
या बरोबर ते जिल्हा ऑयकाॅन असुन २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान जनजागृती केलेली आहे.
ती प्रभावी केल्याबद्दल त्यांचा सत्कार जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री आयुष प्रसाद सरांच्या हाताने सत्कार केला असुन राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या कार्याचे काही क्षण त्याच्या फेसबुक आणि ट्विटर अपलोड केले आहे.

- Advertisement -

मदन लाठींचा आतापर्यंत विविध संस्थांतर्फे सत्कार करण्यात आलेला आहे.

या सर्व उपक्रमाबद्दल आरंभ मराठी चॅनल तर्फे मराठी सिनेअभिनेत्री अनिता दाते केळकर, जळगाव येथील आमदार श्री सुरेश भोळे, उद्योजक रविंद्र लढ्ढा, डॉ निलेश चांडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे
या प्रसंगी श्री पंकज कासार, आरंभ मराठी चॅनलचे संचालक श्री आशुतोष पंड्या आणि त्यांची टिमचे सदस्य उपस्थित होते

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS