जळगाव :– जळगावातील जिनिंग कामगाराचा अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेत सुरेश परमसिंग सोलंकी (25, रा.खेमला, जि.सेंधवा, मध्यप्रदेश, ह.मु.आव्हाणे शिवार) या मजुराचा खून झाला. याप्रकरणी रामलाल नाना बारेला (केरमला, पोस्ट बलवाडी, तहसील वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश , ह.मु.आव्हाणे शिवार, जळगाव) यास अटक करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची लक्ष्मी जिनिंग आहे. त्यांच्याकडे मध्यप्रदेशातून काही तरुण कामास आले आहे. जिनिंगमध्ये काम केल्यानंतर हे मजूर त्याच ठिकाणी बांधलेल्या खोल्यांमध्ये वास्तव्यास असतात. दरवर्षीप्रमाणे सुरेश सोलंकी हा मजूर गेल्या चार ते पाच महिन्यांपुर्वी जिनिंगमध्ये कामाला आला होता. याठिकाणी मजूरी काम करुन तो स्वतःचा उदनिर्वाह करीत होता. शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश सोलंकी याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जिनिंगच्या मागील बाजूस असलेल्या भरत खडके यांच्या शेतात कुट्टीवर झाकलेल्या ताडपत्रीवर आढळताच खळबळ उडाली.
मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणाहून तीन फुटांवर पोलिसांना मंगळसूत्र, पायातील पैंजण व वीस रुपयांचा डॉलर मिळून आला. तसेच मृतदेहाच्या बाजूला गुटखा, तंबाखूची पुडी आणि पैसे व पाण्याची बाटली मिळून आली. तसेच मयताच्या डोक्याला रुमाल बांधलेला होता. पोलिसांनी हे पुरावे जप्त केले.
आरोपीच्या पत्नीचे मयतासोबत असल्याचा संशय असल्याने त्यातून हा खून झाल्याचा संशय आहे. सुरेश सोलंकीच्या खून प्रकरणी मनोहर भगवान सोनवणे (32, आव्हाणे शिवार, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी रामलाल बारेला याच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खुनाची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, एपीआय अनंत अहिरे, हवालदार अनिल फेगडे, धनराज पाटील, प्रवीण पाटील, चेतन पाटील, अनिल मोरे, रामकृष्ण इंगळे, उमेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, नरेंद्र पाटील, विशाल जोशी यांच्याासह एलसीबीचे विजयसिंग पाटील, विजय पाटील, जितेंद्र पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.