Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच बेडवर दोन महिलांना सलाईन, आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार ‘सुरक्षित मातृत्व’ आणि ‘डिजिटल इंडिया’च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेची इतकी भीषण टंचाई आहे की, दोन गरोदर मातांना चक्क एकाच बेडवर झोपवून सलाईन लावण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या या अमानवी आणि निर्लज्ज कारभारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisement -

रुग्णालय आहे की ‘कोंडवाडा’? किनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. ग्रामीण रुग्णालय असूनही ते मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने, सर्व भार या छोट्या केंद्रावर पडला आहे. रुग्णांना पाय ठेवायला जागा नसल्याने, चक्क गरोदर महिलांना अशा धोकादायक परिस्थितीत उपचार घ्यावे लागत आहेत. हे चित्र केवळ आरोग्य व्यवस्थेचा ‘बोजवारा’ उडाल्याचे लक्षण नसून, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस आहे.

कर्मचाऱ्यांची हतबलता, प्रशासनाची झोप येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनसामग्रीत सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जागेअभावी त्यांनाही मर्यादा येत आहेत. “जर नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू झाले असते, तर आज माता-भगिनींना अशा अपमानास्पद परिस्थितीत उपचार घ्यावे लागले नसते,” अशी संतप्त भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

जनतेचा सवाल: अजून किती बळींची वाट पाहणार? दोन गरोदर महिलांना एकाच बेडवर उपचार देणे हे वैद्यकीय प्रोटोकॉलच्या विरोधात असून, यामुळे संसर्गाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तरीही प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. “ग्रामीण रुग्णालय उघडण्यासाठी एखादा मोठा अनर्थ घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?” असा जळजळीत सवाल आता किनगावकरांनी विचारला आहे. तातडीने रुग्णालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

केळी दरात मोठी घसरण! जळगावातील शेतकरी अडचणीत; आमदार अमोलभाऊ जावळे आक्रमक

खरात कनेक्शनची चर्चा तापली! रावेर–यावलमध्ये ‘भोंदू बाबाचे’ धागेदोरे?

दौऱ्यापुरतीच स्वच्छता? यावल तालुक्यात ग्रामपंचायतींचा ‘दिखावा’ उघड

 भव्य सामूहिक विवाहाची घोषणा! परसाडे बु येथे…

यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक…

किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम रूममध्येच रुग्ण तपासणी; नवीन रुग्णालय बंदच
केळी दरात मोठी घसरण! जळगावातील शेतकरी अडचणीत; आमदार अमोलभाऊ जावळे आक्रमक

Kingaon PHC

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS