Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम रूममध्येच रुग्ण तपासणी; नवीन रुग्णालय बंदच

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी थेट पीएम रूम (मृतदेह विच्छेदन कक्ष) मध्ये केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून किनगाव येथे नव्याने उभारलेले ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत. मात्र, शासनाने उभारलेली ही इमारत अद्याप वापरात न आणता धुळखात पडून आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावरच सर्व भार पडत असून, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मर्यादित साधनसामुग्रीत सेवा देत आहेत.

रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना उपलब्ध जागा आणि सुविधा अपुऱ्या पडत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पीएम रूममध्ये तपासणी केली जाणे ही बाब प्रशासनाच्या निष्क्रियतेचे आणि आरोग्य यंत्रणेतील त्रुटींचे निदर्शक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांनी “आठ दिवसांत ग्रामीण रुग्णालय सुरू होईल” असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल दिसून आलेली नाही. त्यामुळे प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

नागरिकांचा सवाल
  • नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू होणार कधी?
  • तोपर्यंत रुग्णांनी अशाच परिस्थितीत उपचार घ्यायचे का?

नागरिकांनी तात्काळ नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली असून, मागणी न मानल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खरात कनेक्शनची चर्चा तापली! रावेर–यावलमध्ये ‘भोंदू बाबाचे’ धागेदोरे?

दौऱ्यापुरतीच स्वच्छता? यावल तालुक्यात ग्रामपंचायतींचा ‘दिखावा’ उघड

 भव्य सामूहिक विवाहाची घोषणा! परसाडे बु येथे…

यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक…

Rural Hospital Issue

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS