किनोद येथे विजेच्या धक्क्याने १२ वर्षीय बालिकेचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगावः – तालुक्यातील किनोद गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय बालिकेला कुलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली अक्षदा किशोर मोरे (वय-१२) असे मयत बालिकेचे नाव आहे.

- Advertisement -

तालुक्यातील किनोद गावात बारा वर्षीय अक्षदा हे आपल्या आई आणि दोन बहिणींसह राहत होती. तिचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई ही हात मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होती. दरम्यान शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्षदाने कुलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले

. तिथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS