किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार : आज होणार सुनावणी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ८ नोव्हेबर २०२३ | राज्यभरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मात्र आज वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी PCPNDT कलमांतर्गत दाखल गुन्ह्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे. समन्स न मिळाल्याने मागील महिन्यातील सुनावणीसाठी इंदुरीकर महाराज गैरहजर होते.

- Advertisement -

आजच्या सुनावणीसाठी ते स्वतः हजर राहून जामीनासाठी अर्ज करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. २०२० साली इंदुरीकर महाराजांनी अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर चांगलीच टीका झाली होती. काहींनी यावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, २०२० साली दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS