चाकू हल्ला करणाऱ्या संशयिताच्या आवळल्या मुसक्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – रस्त्याने जात असताना काहीही कारण नसताना एका तरूणाला मारहाण करीत त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणातील संशयित आरोपी दादू उर्फ दीक्षांत देविदास सपकाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोमनाथ निंबा वंजारी वय-२९ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सोमनाथ वंजारी हा सिध्दार्थ नगरातून जात असतांना काहीही कारण नसतांना दादू उर्फ दिक्षात देवीदास सपकाळे याने माझ्याकडे काय पाहतो असे म्हणत मारहाण केली. त्यावेळी सोमनाथ हे तेथून निघून गेले. त्यानंतर मेहरुण तलावाकडून परत येत असताना दीक्षांत व त्याच्या सोबत असलेल्या एकाने थांबवून पुन्हा मारहाण केली व पोटाजवळ चाकूने वार केले. आमच्या नांदी लागू नको असे म्हणत ते तेथून निघून गेले.

या विषयी जखमीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोर मेहरुण तलाव परिसरातच असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ संजय धनगर, किशोर पाटील, सुधीर साळवे, ललित नारखेडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे यांनी रात्रीच त्याला अटक केली.

Knife Attack

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS