back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

कोरपावली येथे विकासोच्या तोलकाटयाचा लोकापर्ण कार्यक्रम कृषी व सहकार क्षेत्रातील विविध मायवरांच्या उपस्थितीत संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( साक्षीदार न्यूज ) : – शेतकऱ्यांच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केन्द्र शासनाच्या माध्यमातुन सहकार मंत्राल्याचे स्वतंत्र गठन करून शेती व शेतकऱ्यांशी निगडीत विविध विकासाच्या व आर्थिक उन्नतीच्या योजना राबविण्यासाठी सहकार क्षेत्रासाठी विकासाचे दालन उघले असुन याचा फायदा संपुर्ण देशाच्या सहकार क्षेत्राला आणी आपल्या देशाचा केन्द्रबिन्दु असलेल्या शेतकऱ्यास होणार असल्याची माहीती यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा तालुक्यातअग्रस्थानी असलेल्या कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या तोलकाटयाच्या लोकापर्ण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते .

- Advertisement -

कोरपावली तालुका यावल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने कोरपावली मोहराळा मार्गावर उभारण्यात आलेल्या तोलकाटयाचे लोकापर्ण कार्यक्रम कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या हस्ते तोल काटयाची पुजा करून फित कापुन उद्घाटन करण्यात आले ,या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन अॅग्रोफ्युल्य फार्मर्स प्रोडूयुसर कंपनीचे संचालक ए टी चौधरी ,वासुदेव पाटील,पराग शिंदे यांच्यासह कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, कोरपावलीच्या उपसरपंच हमिदाबी पिरन पटेल, महेलखेडीचे उपसरपंच जयंत पाटील, मोहराळा विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन राजेन्द्र महाजन, मोहराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ नंदा महाजन यावल येथील कृषी केन्द्रांचे संचालक सोहन कोळंबे व प्रशांत पाटील यांच्यासह पंचक्रोशितील शेतकरी व व्यापारीसह परिसरातील ग्रामस्थ कार्यक्रमास मोठया संख्येत उपास्थित होते .

या प्रसंगी तोलकाटा लोकापर्ण ते संपुर्ण प्रक्रीयेत राकेश फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईस चेअरमन सुधाकर नेहते,सौ जयश्री नेहेते, दतात्रय महाजन ,यशवंत फेगडे , वसंत महाजन,शरद पाटील,ललित महाजन ,महेन्द्र नेहेते,ईमरान पटेल , सौ सुलोचना जावळे,सिकंदर तडवी , मिलींद महाजन,विलास महाजन व महमंद पटेल यांनी अतिश्य मोलाची साथ दिल्यामुळेच आपणास या कामात यश मिळाल्याचे गौरव उद्द्गार चेअरमन राकेश फेगडे यांनी व्यक्त केले,याकार्यक्रमा चे सुत्रसंचालन व उपास्थितांचे आभार संचालक मिलींद महाजन यांनी मानले .

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS