Girna River Sand | अवैध वाळू वाहतुकीविरोधात कोठलीच्या महिलांचा रस्त्यावर एल्गार! तहसीलदार येईपर्यंत ठिय्या, डंपर जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Girna River Sand | गोरख माळी | भडगाव तालुक्यातील कोठली गावात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महिलांनी थेट रस्त्यावर उतरून ठाम भूमिका घेतल्याची घटना घडली असून, या आंदोलनामुळे प्रशासनालाही तातडीने दखल घ्यावी लागली. गिरणा नदी पात्रातून जेसीबीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उत्खनन करून ती मोठ्या डंपरद्वारे गावातून वाहून नेली जात असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

- Advertisement -

सायंकाळी सहा वाजल्यानंतर दहा व चौदा टायरीचे अवजड डंपर वेगात गावातून जात असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर कोठली येथील महिलांनी काल रात्री सुमारे नऊच्या सुमारास एका दहा टायरी डंपरला थेट रस्त्यावर अडवले. “तहसीलदार घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही,” असा ठाम इशारा महिलांनी दिला.

घटनेची माहिती मिळताच शीतल सोलाट तहसीलदार रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी महिलांच्या आणि ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर स्पॉटवरच पंचनामा करून अवैध वाळू वाहतूक करणारा दहा टायरी डंपर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला. संबंधित डंपरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून डंपर क्रमांक एम.एच. ४८ ए.वाय. ९८५५ (मूळ – चाळीसगाव) द्वारे वाळू वाहतूक केली जात होती. या डंपरच्या दर्शनी भागावर प्रथमदर्शनी ओळख म्हणून मजकूर लिहिलेला आढळून आला आहे.

या कारवाईदरम्यान कोठली गावच्या सरपंच उज्ज्वला गोकुल पाटील यांच्यासह महिलांनी आणि ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतुकीला तीव्र विरोध केला. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी करत होते.

या वेळी तहसीलदारांसह ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार निलेश ब्राम्हणकार तसेच पो.कॉ.भूषण पाटील,पो.कॉ.सुनील राजपूत,प्रवीण परदेशी,संदीप पाटील,राजेंद्र पाटील पोलीस पाटील अतुल पाटील, कोतवाल भगवान कोळी यावेळी उपस्थितीत होते..

कोठली गावात सातत्याने सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, महिलांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका भविष्यातील कारवाईसाठी निर्णायक ठरेल, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

जळगावात प्रचारादरम्यान धक्कादायक प्रकार! एका उमेदवाराच्या सासऱ्याला मारहाणीचा आरोप
नातवाच्या खांद्यावर हात, डोळ्यात अश्रू आणि अपक्ष उमेदवारी मागे गुपित काय ?
जळगांव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ 22 लाख रुपयाचा विषय काय ?
“५० वर्षे झेंडा उचलणाऱ्या निष्ठावंतांचा अपमान; भाजपात कार्यकर्त्यांची क्रूर चेष्टा!”

Girna River Sand

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS