कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतापर्यंत पोहचविणार – रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

मुक्ताईनगर (सुनील भोळे) : – मुक्ताईनगर मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड, मधापूरी, चारठाणा येथे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांचे आशीर्वाद घेऊन आपल्या “तुतारी वाजवणारा माणूस” या निशाणी समोरील बटण दाबुन मतदानरूपी आशिर्वाद देण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

यावेळी गावागावात ॲड. रोहिणीताई खडसे यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे मिळालेले प्रेम पाठिंबा बघता गेले तीस पस्तीस वर्ष एकनाथराव खडसे आणि गेले पाच वर्ष रोहिणी खडसे या मतदारसंघाला आपला परिवार मानून प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात धावुन जाऊन करत असलेल्या कार्याची प्रचिती आली.

यावेळी ॲड.रोहिणी खडसे या मतदारांशी संवाद साधताना म्हणाल्या गेल्या तीस वर्षात तुमच्या आशीर्वादाने आ.एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मतदारसंघातील प्रत्येक गाव खेड्यापासून शहरापर्यंत, वाडीवस्तीपासून आदिवासी पाड्यापर्यंत केलेला सर्वांगिण विकास सर्वश्रृत आहे. विकासाच्या याच ध्येयाने प्रेरित होऊन आगामी काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधेल. कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतापर्यंत पोहचवणे, प्रत्येक घरापर्यंत मुबलक शुद्ध पाणी पुरवठा करणे, महिलांच्या सुरक्षेला आणि सक्षमीकरणाला, तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याला आपले प्राधान्य असेल. आपल्या या गावांचा परिसर हा मुक्ताई भवानी वनक्षेत्राला लागून आहे. या क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील त्यातून पर्यटन वाढीला चालना मिळेल. त्याचबरोबर वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतीचे वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेत जमिनींना शासकिय निधीतून कुंपण करण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी आ.एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटील आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढत असुन आपण आतापर्यंत दिलेली साथ कायम ठेवण्याची विनंती रोहिणी खडसे यांनी मतदारांना केली. यावेळी शारदा खडसे चौधरी यांच्यासह ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS