Ladaki Bahin | साक्षीदार न्यूज | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचा ₹१५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही बहिणींना कालपासूनच पैसे मिळाले असून इतरांच्या खात्यातही टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जात आहे.
ग्रामविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल ₹३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, प्रत्येक लाभार्थी महिलेला ₹१५०० मिळणार आहे.
खात्यात पैसे आलेत का? असे करा चेक
👉 ऑनलाइन पद्धत
-
आपल्या बँकेच्या अॅप किंवा नेटबँकिंगमध्ये लॉगिन करा.
-
“Transaction History” तपासा.
-
जर हप्ता जमा झाला असेल, तर मेसेजद्वारेही माहिती मिळेल.
👉 ऑफलाइन पद्धत
-
जवळच्या बँकेत जाऊन बॅलन्स तपासा.
-
पासबुकवर एन्ट्री करून शेवटची ट्रान्झॅक्शन तपासा.
यावल येथील हरलेल्या बालकाचा या अवस्थेत आढळला मृतदेह
Ladaki Bahin