बँडचे भाडे लाखो रुपये थकले अखेर गुन्हा दाखल !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | जळगाव तालुक्यातील एका गावातील मालकाच्या मृत्यूनंतर भाडेतत्त्वावर दिलेल्या बँडचे तब्बल ७ लाख ७५ हजार रुपये भाडे दिले नाही म्हणून पाच जणांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर कंडारी येथील किरण संपत यांचा विवाह सोहळा व इतर शुभा कार्यामध्ये बैंड वाजविण्याचा व्यवसाया होता. त्यांचे निधन झाल्यानंतर सदर बँड साहित्य रायपूर येथेच भाडेतत्त्वाव देण्यात आले. मात्र, जून २०२० पासून या बँड साहित्याचे भाडे मिळत नसल्याने किरण यांच्या कुटुंबीयांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली. ही रक्कम मिळत नसल्याने मयताचे नातेवाइक रवींद्र दगडू धनगर (३२) यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राजू शेख बाबू पटेल (५२), जाकीर शेख युनूस (३४) – आरिफ शेख युनूस शेख (३२), भैया बाबू पटेल (३५), ताहीर राजू पटेल (१९ सर्व रा. रायपूर, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार रवींद्र तायडे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS